जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल.
वृषभ :-
मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी.
मिथुन :-
स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.
कर्क :-
उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आवडीवर खर्च कराल.
सिंह :-
आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका.
कन्या :-
मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल.
तूळ :-
जवळची व्यक्ति भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल.
वृश्चिक :-
कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.
धनू :-
अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल.
मकर :-
जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो.
कुंभ :-
जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
मीन :-
व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात.
हेही वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.