एरंडोल येथील अपूर्ण अवस्थेत असलेल्या क्रीडा संकुलसाठी 5 कोटी निधी देणार -क्रीडा मंत्री गिरीश महाजन

Spread the love

३३ वी किशोर गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आमदार चषक-२०२२ ला सुरुवात-
एरंडोल :- युती शासनकाळी एरंडोल तालुक्यासाठी क्रीडा संकुल च्या कामाला सुरुवात झाली होती निधी अभावी या क्रीडा संकुलाचे काम अपूर्ण राहिले आहे. क्रीडा संकुलाचे हे राहिलेले उर्वरित कामासाठी मी माझ्या निधीतून पाच कोटी रुपये लागलीच मंजूर करून देतो व लवकरात लवकर भव्य दिव्य सह क्रीडा संकुल सुरू करण्यात येईल असे आश्वासन क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता कुस्ती, कबड्डी, खो खो, क्रिकेट, बॅडमिंटन अशा खेळांकडे वळून आपले शरीर मजबूत करावे असे आव्हान केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार चिमणराव पाटील म्हणाले की एरंडोल शहरात पहिल्यांदाच एवढ्या भव्य दिव्य अशा आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विकास कामे तर भरपूर होतात परंतु माझ्या मतदारसंघातून खेळाडू सुद्धा घडले पाहिजे जे आपल्या जिल्ह्याचे राज्याचे व देशाचे नाव लौकिक करतील अशा खेळाडूंसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देतो असे सांगितले.

जळगांव जिल्हा कबड्डी असोसिएशन, क्रीडा प्रबोधिनी, एरंडोल आयोजित ३३ वी किशोर/किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आमदार चषक-२०२२ उदघाटन समारोह आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे ग्रामविकास व पंचायती राज, क्रिडा व युवक कल्याण मंत्री .ना.गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते काबरे विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.

याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, भाजपा महाराष्ट्र राज्य जनजाती क्षेत्रप्रमुख अॕड.किशोर काळकर, मा.नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, रमेश परदेशी, रवींद्र महाजन, तालुकाप्रमुख रविंद्र जाधव, बबलु पाटील, शहरप्रमुख आनंदा चौधरी(भगत), मयुर महाजन, मुख्याधिकारी विकास नवाळे, मा.सभापती शालिक गायकवाड, विजु महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मनोज पाटील, कृष्णा ओतारी, प्रवराज पाटील, राहुल तिवारी, आनंद दाभाडे,

उपतालुकाप्रमुख समाधान मगर, डाॕ.सुधीर काबरा, रविंद्र पाटील, प्रभाकर सोनवणे, अशोक चौधरी, अॕड.ओम त्रिवेदी, शामभाऊ कोगटा, डॉ राजेंद्र चौधरी,डाॕ.प्रविण वाघ, डाॕ.देवेश वाघ, डाॕ.किशोर पाटील, तालुका क्रीडा अधिकारी सुचिता घुलाणे, गुरूदत्त चव्हाण, पी.जी.चौधरी, दिपक वाल्डे, मा.नगरसेवक चिंतामण पाटील, गोविंदा बिर्ला, शिवाजी पाटील, अमोल जाधव यांचेसह कबड्डी खेळाडु, आयोजक, क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बाळासाहेबांची शिवसेना एरंडोल तालुक्याच्या वतीने तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने क्रीडामंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
एरंडोल शहरात पहिल्यांदाच प्रेक्षकांना कबड्डी मॅचेस पाहण्यासाठी उंच अशा गॅलरीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत सुरडकर यांनी केले आभार दीपक वाल्डे यांनी केले या स्पर्धेकरिता डॉक्टर राहुल वाघ, राकेश चौधरी, मनीष ठाकूर यांचे सह क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू परिश्रम घेत आहे

हे पण वाचा

टीम झुंजार