कासोदा येथे भरदिवसा घरफोडी,अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 40 हजार रुपये केले लंपास

Spread the love

कासोदा :- कुटुंबासहित दिवाळीनिमित्त कुलदैवतला गेलेल्या किराणा दुकानदाराने व्यापाऱ्यांना देण्यासाठी काढून ठेवलेल्या २ लाख ४० हजार रुपयांवर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारत पोबारा केल्याची घटना दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी सात वाजेदरम्यान घडली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील सिध्दार्थ नगर मधील रहिवासी विजय शिवाजी वारे याच परिसरात घराच्या पुढील भागात किराणा दुकान चालवता

सध्या दिवाळी असल्याने व्यवसाय चांगल्या स्वरुपात झाल्याने त्या मालाच्या विक्रीतून जमलेली १ लाख २० हजार रुपये व काही दागिने बँकेत ठेवून त्यावर कर्ज घेवून १ लाख २० हजार रुपये असे एकूण २ लाख ४० हजार रुपये घेतलेल्या मालाच्या उधारीचे व्यापाऱ्यांना देण्यासाठी घरात आणून ठेवली होती परंतू विजय वारे हे कुटुंबासहित दिवाळीनिमित्त मध्य प्रदेशातील सेंधवा येथील कुलदैवत बिजासन माताच्या दर्शनासाठी दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता घराला कुलूप लावून गेले होते

संध्याकाळी सात वाजता घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाची कडी वाकलेली व कुलुप तोडलेले दिसले असता त्यांनी लागलीच घराचा दरवाजा उघडून रक्कम ठेवलेल्या स्वयंपाक खोलीत गेले असता रक्कम ठेवलेला डबा उघडा दिसला त्यामुळे विजय वारे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले . याबाबत कासोदा पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरोधात नोंद करण्यात आली.

भरदिवसा झालेल्या या घरफोडी मुळे कासोदा पोलीस प्रशासना पुढे आव्हान निर्माण झाले आहे.
सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे झालेली चोरी, विश्राम नगर येथे दोन घरांमध्ये झालेली चोरी, ए.टी.एम मध्ये झालेली चोरी या सर्व चोऱ्यांच्या तपास आतापर्यंत लागलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून कासोदा व परिसरात होते त्या चोऱ्यांमुळे कासोदा पोलीस प्रशासनाच्या धाक चोरट्यांवर राहिला नाही असे गावातील सुज्ञ नागरिकांचे मत आहे. सदा वर्दळ असलेल्या रोडवरील घरात भर दिवसा होत असलेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भयचे वातावरण निर्माण झाले आहे

टीम झुंजार