आत्ताची मोठी बातमी ! मोरबी येथील मच्छू नदीवरील केबल पूल कोसळून 68 लोकांचा मृत्यू,मयतांमध्ये महिला व लहान मुलाच्या समावेश

Spread the love

Gujarat Accident: या घटनेनंतर गुजरात सरकार खडबडून जागं झालं आहे. सरकारने तातडीने पावलं उचलत या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये पाच जणांचा समावेश असेल.
मोरबी:
गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता केबल सस्पेन्शन पूल कोसळल्याने सुमारे ४०० लोक मच्छू नदीत पडले. या दुर्घटनेत आतापर्यंत ६८ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये २० पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. तर ८० पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेनंतर गुजरात सरकार खडबडून जागं झालं आहे. सरकारने तातडीने पावलं उचलत या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये पाच जणांचा समावेश असेल. गुजरात सरकारचे मंत्री बृजेश मेरजा हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच गुजरात मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल हे घटनास्थळी पोहचले
गेल्या ६ महिन्यांपासून हा पूल बंद होता. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून नुकतेच त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.

या पुलाची क्षमता सुमारे १०० लोकांची आहे, मात्र रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्यावर सुमारे ५०० लोकांची गर्दी झाली होती. हेच अपघाताचे कारण ठरले. मोरबीचे भाजप खासदार मोहन कुंडारिया यांनी भास्करला सांगितले की, पूल कोसळल्यामुळे लोक जिथे पडले तिथे १५ फूट पाणी होते.

हा पूल १४० वर्षांहून अधिक जुना आहे
मोरबीचा हा झुलता पूल १४० वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे ७६५ फूट आहे. हा झुलता पूल गुजरातच्या मोरबीचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. २० फेब्रुवारी १८७९ रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. ते १८८० मध्ये त्यावेळी सुमारे ३.५ लाख खर्चून हा पूल उभारण्यात आला होता. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते. तेव्हापासून या पुलाचे अनेकवेळा नूतनीकरण करण्यात आले. नुकतेच दिवाळीपूर्वी दोन कोटी रुपये खर्चून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले

टीम झुंजार