जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांती मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल.
वृषभ :-
आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.
मिथुन :-
जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.
कर्क :-
मानसिक चंचलता जाणवेल. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.
सिंह :-
व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.
कन्या :-
मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा.
तूळ :-
आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.
वृश्चिक :-
अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. नवीन ओळख होईल.
धनू :-
नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल.
मकर :-
काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. अतिविचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.
कुंभ :-
कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
मीन :-
अंग मेहनतीला मागे हटु नका. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






