जळगाव : – नवीन बसस्थानक आवारात रात्री नऊच्या सुमारास अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला असून, या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. शहरातील नवीन बसस्थानक परिसरात रात्री नऊच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा (वय अंदाजे ६०) मृतदेह आढळला. याबाबत येथील प्रवाशांनी जिल्हापेठ पोलिसांना कळविले.
जिल्हापेठ पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे यांनी मृत घोषित केले.याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पोलिस नाईक तुषार जावरे तपास करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






