जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
छोटे प्रवास घडतील. एखादी विशेष व्यवस्था करावी लागेल. समजुतीत बदल होण्याची शक्यता. मनात आकर्षण भावना वाढू शकते. दिवस मनाजोगा जाईल.
वृषभ :-
अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरात आनंदवार्ता मिळेल. दिवस चांगला जाईल. नवीन करार पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक गोष्टीत दिवस जाईल.
मिथुन :-
महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते. घरात शिस्त बाळगाल. नातेवाईक भेटायला येतील.
कर्क :-
तुमचे कौशल्य पणाला लावा. नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. प्रलंबित कामे मार्गी लावाल.
सिंह :-
आपल्याला आवडणार्या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल.
कन्या :-
आपल्यातील कालगुणांना वाव द्यावा. मात्र कौतुकाची फार अपेक्षा करू नका. समोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. नसत्या काळज्या करू नका.
तूळ :-
आपले स्वत्व राखून बोलाल. बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल. एखादी भेटवस्तू मिळेल. मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल.
वृश्चिक :-
काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. दिवसभरात काहींना काही लाभ मिळेल. तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.
धनू :-
स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते. कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल. कौतुकास पात्र व्हाल.
मकर :-
अचानक धनलाभ संभवतो. आपल्या तत्वांना मुराद घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
कुंभ :-
वडीलधार्या व्यक्तींना नाराज करू नका. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मीन :-
जुनी कामे मार्गी लावाल. जोडीदाराशी संघर्ष टाळावा. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सासुरवाडीची मदत मिळेल.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






