सावदा : – अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सावदा, ता.रावेर पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक देवीदास इंगोले व उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली. या कारवाईने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार इतक्या रूपये देण्याचे ठरले.
मात्र ट्रॅपचा संशय आल्याने संबंधितांनी लाच स्वीकारली नसलीतरी लाच मागणी सिद्ध झाल्याने जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने आज मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हे आढावा बैठकीआधीच :
कारवाईजिल्हा पोलीस दलाची मंगळवारी सकाळी १० वाजता मंगलम सभागृहात गुन्हे आढावा बैठक होती. नूतन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीसाठी जळगावाला येण्याच्या तयारीत असतानाच इंगोले व गायकवाड यांना एसीबीने ताब्यात घेतले. ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्याच पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपअधीक्षक शशिकांत पाटील तपास करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






