अरे बापरे ; भररस्त्यात शिवशाही बस जळून झाली खाक, पहा थरारक व्हिडिओ.

Spread the love

पुणे : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच गेल्या महिन्यात नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेला काही दिवस उलट नाही तोवर पुण्यातील येरवड्यातही आज भररस्त्यात शिवशाही बस जळून खाक झाली. सुदैवाने या बसमधील 42 प्रवासी हे वेळीच खाली उतरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुण्यात आज बर्निंग बसचा थरारक घटना पाहण्यास मिळाली. पुण्यातील येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली. ही बस यवतमाळहून चिंचवडकडे आली होती. शास्त्रीचौकात पोहोचल्यानंतर शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेतली.

पहा व्हिडिओ :

त्यानंतर बसमधून तात्काळ सर्व ४२ प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. बसच्या पुढच्या भागातून आगीचे लोळ बाहेर पडत होते. तर बसच्या मागच्या भागातून धुराचे लोट बाहेर पडत होते. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखून बसमधून सर्व प्रवासी खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला

हे वाचलंत का ?

टीम झुंजार