चोपडा : – सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिष दाखवून त्यांना पळवून नेत त्यांच्यावर होणारे अत्याचाराच्या घटना काहीसे वाढलेले दिसून येतेय. अशीच एक घटना चोपडा तालुक्यात घडलीय. तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेत दोन महिने अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तरुणीने चोपडा शहर पोलिसात तरुणाविरोधात तक्रार दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
काय आहे घटना ?
चोपडा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी विलेश दारासिंग पावरा (दोंदवाडे, ता.शिरपूर) याने प्रेमसंबध निर्माण करीत लग्नाचे आमिष देत पळवून नेले. नंदुरबार जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यातील एका गावात नेत गुन्हा दाखल झाल्यापासूनच्या आधीच्या दोन महिन्यांपर्यंत वारंवार अत्याचार केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने चोपडा पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने फिर्यादीवरून संशयीत आरोपी विलेश दारासिंग पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






