धरणगाव प्रतिनिधी :- राज्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री यांनी ईडीच्या भीतीमुळे तसेच सत्तेच्या लालसे पोटी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मिंदे (शिंदे) गटात सामील झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका धरणगाव येथील महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेत केली. धरणगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेचा दुसऱ्या टप्प्याची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत,ठाणे येथील युवा सेनेचे अध्यक्ष जनार्दन पाटील, जळगावच्या महापौर जय श्री महाजन, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, शरद तायडे, सुनील महाजन, शरद कोळी, महानंदा पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर माजी जि प उपाध्यक्ष जानकीराम पाटील, गजानन मालपुरे, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

सुषमाताई अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका करीत म्हणाले की हिंदुत्वाच्या नावावर शिंदे गटाने जनतेची दिशाभूल केली आहे जो व्यक्ती राज्याचा पाणीपुरवठा मंत्री आहे तो आपल्या गावाला पाणी देऊ शकत नाही तसेच प्रत्येक टेंडरवर टक्केवारी घेतल्याशिवाय काम देत नाही.हिदुत्वाच्या नावाने दिशाभूल करीत आहेत. एवढी पाप कुठे फेडणार असाही प्रति सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
त्यापूर्वी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी आपल्या मनोगतात म्हटले आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी येथे आलो आहोत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिवसेना सोडली गद्दारी केली आणि जनतेची दिशाभूल करून राजकारण करीत असल्याचा आरोप केला

तसेच युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे शरद कोळी यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर खुलेआम टीका करीत म्हणाले की गुलाबराव पाटलांना पाणीपुरवठा मंत्री न करता हातभट्टी दारूचा मंत्री करायला पाहिजे होता कारण तुम्ही या मतदारसंघातील तरुणांना रोजगार न देता दारू पिण्याचे सवयी लावत आहात.गुलाबराव शिवसेना संपवण्याची भाषा करीत आहेत तुम्ही काय शिवसेना संपवणार तुमच्या ७० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही.
सुषमा अंधारे यांची जाहीर सभा संध्याकाळी सहा वाजता नियोजित होती परंतु तब्बल आठ वाजता सुषमाताईंच धरणगावात आगमन झाले यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने सुषमाताईंचे स्वागत करण्यात आले सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांचा वाढदिवस असल्याकारणाने उपस्थित मान्यवरांनी गुलाबी गुलाब वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन जाहीर सत्कार केला आणि जळगाव ग्रामीण मतदार संघाचे भावी आमदार निश्चितच होणार असे सांगितले सभेला शहरासह तालुक्यातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक नागरिकांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला






