झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
तिसंगी :- ( ता. पंढरपूर ) श्री गणेश कृषी केंद्र मार्फत प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान आणि शेतकरी मेळावा आयोजित केला याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजीराव वाघमोडे देशमुख, तिसंगीचे माजी सरपंच हेमंत कुमार पाटील, इको ऍग्री सीडचे महाराष्ट्र प्रभारी शिवकुमार साहेब, तिसंगीचे उपसरपंच मल्हारी हेगडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक मासाळ, शिवाजी रुपनर उपस्थित होते याप्रसंगी प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान केला व शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने इको सिड्सच्या मका बियाणाच्या क्रांतिकारी वाणांबद्दल कंपनीची प्रतिनिधी देढे साहेबांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्री गणेश कृषी केंद्रचे मालक राजकुमार पवार यांनी आपल्या दुकानांमध्ये विक्रीस असलेल्या बियाणाची माहिती शेतकऱ्यांना दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरज रुपनर यांनी केले.

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






