धरणगाव :- शहरातील गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून ३६ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
धरणगाव शहरातील अमळनेर रोडवर असणाऱ्या गायरानासाठी राखीव असलेल्या जमीनीवरील वादग्रस्त अतिक्रमण कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आले. दरम्यान, या प्रक्रियेमुळे शहरात कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून दिनांक २ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेपासून ते दिनांक ४ नोव्हेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत अर्थात ३६ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या संदर्भातील आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी पारीत केले आहेत. याआदेशातून रूग्णसेवा, पाणी पुरवठा, शहरातून जाणारी वाहतूक, शासकीय कर्मचारी,सार्वजनीक वितरण व्यवस्था आदींना वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






