नाशिक : – सध्या महाराष्ट्रात बस अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच राज्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही-शिवनेरी बसला लागणाऱ्या आगीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येतेय. 24 तासांपूर्वी पुण्यात शिवशाही बसला आग लागल्याची घटना ताजी असताना आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार पाहायला मिळालाय.
नाशिक पुणे महामार्गावर नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या शिवनेरी बसने पेट घेतला आहे. गाडीने पेट घेताच प्रवाशी गाडी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते.
पहा व्हिडिओ :
शॉर्ट सर्किटमुळे ही बस पेटली असावी, अशी शंका व्यक्त केली जातेय. मात्र आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी बचावकार्यही करण्यात आलं. पण अवघ्या काही मिनिटांत बस जळून खाक झाली. मात्र बस पेटण्याच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जाते आहे. याआधीही अनेकदा शिवशाही बसला आग लागला्याच्या घटना समोर आल्या आहेत
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






