जळगाव :- शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेन ठाकरे गटाच्या युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना महाप्रबोधन यात्रेत भाषण करण्यास जळगाव जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. परवा धरणगाव, काल पाचोरा आणि एरंडोल येथे यानिमित्त सभा झाल्या. यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांवर अतिशय असभ्य भाषेत टीका केल्याचा त्यांचेवर आक्षेप असून त्यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी गुजर समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. यामुळे आज चोपडा तर उद्या मुक्ताईनगरातील शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ते भाषण करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पोलीस प्रशासनाने याबाबतची नोटीस आज कोळी यांना जारी केली. जळगावात ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस दाखल झाले असता शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






