नाशिक : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यामुळे नाशिकमधील प्रेमी युगुल गोव्याला पळून गेले. तिथे जाऊन दोघांनी बनावट ओळखपत्राच्या आधारे एका लॉजवर रुम बूक केली. त्यानंतर त्यांनी आयुष्याची अखेर करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. विष प्राशन केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणी बचावली.
गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रियकर २१ वर्षांचा होता, तर प्रेयसी २२ वर्षांची आहे. तिच्यावर गोव्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाशिक येथील गौरव यादवचे २२ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांचा कडाडून विरोध होता. त्यामुळे दोघांनी गोव्याला पळून जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात ते रेल्वेने गोव्याला आले. तिथे दोघं एका लॉजमध्ये थांबले.
दोघांनी गोव्यातील कोलवा परिसरात आपले नाव बदलत किशोर अय्यर या बनावट नावाने रूम घेतली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांनी लग्न करण्याऐवजी त्यांनी विष पिऊन जीव देण्याचा निर्णय घेतला. यातून तरुणी बचावली, तर तरुणाचा जीव गेला.
नाशिक पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मुलाचा मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक गोव्यात दाखल झाले आहेत. तर मुलीचे नातेवाईक ती उपचार घेत असलेल्या रुग्णालयात पोहोचले आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर तरुणीने गोव्यातील कोलवा पोलिसांना जबाब दिला. दोघंही आपले नाव बदलून गोव्यातील लॉजवर राहत होते.
पुढील तपास कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. या घटनेने दोन्ही राज्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






