चाळीसगाव :- चिरंजीव गणेश कैलास पाटील वय वर्षे एकवीस रा. पिम्प्री हा मुलगा काही महिन्यापूर्वी नाशिक येथे कंपनीमध्ये कामाला लागला होता घरची परिस्थिती बेताची म्हणून काहीतरी काम करून नाशिकमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी गणेश नाशिक येथे कंपनीत काम करत होता 22/09/22 ला दुपारी गणेश कम्पनीत् कामाला जात असताना त्याचा एक्सीडेंट झाला गणेश ला डोक्याला जबर मार लागल्यामुळे गणेशला तात्काळ पोलीस बांधवानी सरकारी हॉस्पिटल ला एडमिंट केल नातेवाईकांना माहिती पडल्यानंतर त्यांनी गणेश ला सह्याद्री हॉस्पिटल नाशिक ला सिफ्ट केले त्याला जवळजवळ पाच ते सहा लाख रुपये कमित कमी खर्च येणार असे तेथील डॉक्टरानी सांगितल्या नंतर गणेश च्या घरच्यानचे होश उड़ाले एवढा खर्च आणायचा कुठून कसं करायचं घरच्यांना विचार पडला जवळ एक रुपया नसताना हा प्रश्न मांडायचा कसा ही बातमी श्री राहुल नंदू पाटील गणेश चे चुलत भाऊ श्रीनगर आर्मी मध्ये कार्यरत आहेत त्यांना माहिती पडली त्यांनी व्हाट्सअप द्वारे ही माहिती पिम्प्री गावातील व्हाटसब ग्रुप वर शेयर केली.

आणि जेवढे जमा होईल तेवढा फंडिंग जमा करण्याचा प्रयत्न केला तर गावातील प्रत्येक व्यक्तीने नोकरी वर्गाने शेतकरी बांधवांनी मदतीचा हाथ पुठे केला पिम्प्री गावाचा आदर्श घेऊन शिरसगाव, टाकळी, डोंनदीगर, तलोदा, माळशेवगे, देवळी, पंच क्रोशीतील फौजी पोलिस बांधवग्रुप, जय जवान ग्रुप चाळीसगाव, नाशिक , धुळे, सातारा, तसेच विदेशातूनही गणेश च्या उपचारासाठी मदत मिळायला सुरुवात झाली.
ही बातमी पसरताच आठ ते दहा दिवसात गणेशला तीन लाख वीस हजाराची मदत झाली आणी गणेश चा उपचार फास्ट सुरु झाला बगता बगता सर्वच्या आशीर्वादा ने गणेश ची अतिशय क्रिटिकल परिस्थिति सुधारु लागली 2 वेळस गणेश चे ब्रेन ऑपरेशन झाले आणी 12 ओक्टंबर 22 ला गणेश चा सुखरूप डिस्चार्ज झाला.

आज गणेश सगळ्यांमध्ये हसत खेळत आहे आणि पहिल्यासारखी नोरमल लाइफ जगत आहे.घरातील एकूलता एक मूलगा गणेश त्याला वाचवन्या साठी चालीसगांव तालुक्यातील पिम्प्री बु प्र दे गावाने जो आदर्श तालुक्या साठी निर्माण केला तो अविस्मरणीय आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






