ऐकावं ते नवलंच : आठ वर्षांच्या मुलाने घेतला कोब्राचा चावा; कोब्रा सापाचा मृत्यू, चावा घेणारा मुलगा ठणठणीत

Spread the love

रायपूर :- साप चावून मृ’त्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. मात्र, आज आपण जी घटना पाहणार आहोत ती जाणून तुम्ही थक्क व्हाल. छत्तीसगडमधील एका विचित्र घटनेमध्ये आठ वर्षाच्या मुलाने कोब्रा सापाचा चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाला आहे. राजधानी रायपूरपासून स३५० किमी अंतरावर असलेल्या जसपूर जिल्ह्यामधील पंढरपेढ या दुर्गम भागातील गावामध्ये या मुलाच्या हाताला सापाने विळखा घातला. त्यानंतर या मुलाने सापापासून सुटका करुन घेण्यासाठी सापाचा चावा घेतला. ज्यात सापाचाच मृत्यू झाला.

सोमवारी दिपक नावाचा हा मुलगा त्याच्या घरामागील अंगणामध्ये खेळत असताना त्याला विषारी कोब्रा सापाने चावा घेतला. “सापाने माझ्या हाताला विखळा मारला आणि हाताचा चावा घेतला. मला फार त्रास होत होता. मी हात झटकून सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे मी दोन वेळा सापाला चावलो. हे सर्व फार वेगाने घडलं,” असं दिपकने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितल्याचं न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

या घटनेनंतर दिपकला जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आलं. “त्याला सापाचं विष उतरवणारं औषध देण्यात आलं आणि दिवसभर देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं,” असं या आरोग्य केंद्रातील डॉक्टर जेम्स मिनीज यांनी सांगितलं. “दिपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. त्याला साप चावला तरी त्याच्या शरीरामध्ये विष भिनलं नव्हतं. अशापद्धतीने साप चावणं फार वेदनादायी असतं. यामध्ये फक्त ज्या ठिकाणी साप चावला आहे तिथेच फार वेदना होतात,” अशी माहिती सर्पतज्ज्ञ असलेल्या कासीर हुसैन यांनी दिली. मात्र अशापद्धतीने व्यक्तीने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू होणं ही दुर्मिळ घटना आहे.

“अशाप्रकारची घटना जसपूर जिल्ह्यामध्ये घडल्याचं मला आठत नाही,” अशी प्रतिक्रिया येथील वरिष्ठ पत्रकार रमेश शर्मा यांनी दिली आहे. जसपूर हे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला नागलोक असंही म्हटलं जातं कारण या ठिकाणी २०० हून अधिक सापांच्या प्रजाती आढळून येतात अशी माहितीही शर्मा यांनी दिली.

आई बहिणीनं रुग्णालयात नेले…

त्यानंतर लगेचच दीपकने आपल्या बहिणीला त्याला साप चावल्याचं सांगितले, त्यानंतर आई आणि बहिणीने त्याला रुग्णालयात नेले. आपल्या मुलाला साप चावला होता आणि मुलानेही रागाच्या भरात त्याच सापाला चावला असल्याचं आईने सांगितले. दीपकची बहीणही सांगते की, माझा भाऊ माझ्याकडे धावत आला आणि मला साप चावल्याचं सांगितले. मग आई आणि आम्ही मिळून त्याला दवाखान्यात नेले. ही पहिलीच वेळ आहे की, विषारी नाग कोब्रा मुलाला चावला आणि उपचारादरम्यान तो वाचला. मात्र मुलाच्या चाव्यामुळे सापाचा मृत्यू झाला.

सर्प तज्ज्ञांना काय वाटतं ?

या आश्चर्यकारक घटनेबाबत जशपूर जिल्ह्यातील सर्प तज्ज्ञ डॉ. केसर हुसेन यांनी सांगितले की, साप चावल्यावर त्याचे विष शरीरात सोडतो, परंतु या प्रकरणात सापाने मुलाला चावल्यानंतर त्याचे विष शक्यतो सोडले नाही अशा वेळी सर्पदंशाचा जीव वाचतो आणि त्यावर उपचाराने जीव वाचला असं काही लोकांचे मत आहे. सत्य हे आहे की साप चावला, पण त्याने विष सोडले नाही असं त्यांनी सांगितले. या घटनेनं जशपूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरली आहे. कोब्रासारख्या विषारी सापाने चावा घेतल्यानंतर मुलाला काहीही झाले नाही, परंतु जेव्हा मुलाने सापाला चावलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला. हा देवाचा चमत्कार मानून आदिवासी भागातील लोक दूरदूरवरून त्या बालकाला पाहायला येत आहेत.

दुखापतीमुळे साप मरण पावला

त्याचवेळी जशपूर जिल्ह्यातील डॉ. लक्ष्मीकांत बापट सांगतात की, दीपकला जेव्हा साप चावला, तेव्हा त्याला विषरोधी इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले. पण त्याने ज्या सापाला चावलं त्याचा मृत्यू जखमी होऊन झाल्याचं डॉक्टर म्हणाले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार