नाशिक : – सध्या महीला अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच तरुणाने तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवत रजिस्टर मॅरेज करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तरुणाने युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केले होते. तीने मुलीला जन्म दिल्यानंतर दोघींनाही सोडून पळून गेल्याची बाब समोर आली आहे. संबंधित प्रकार पीडित महिलेने मालवणी पोलीस ठाण्यात कथन केला होता.यानंतर महिलेने दिलेली तक्रार आणि त्यानंतर तो गुन्हा नाशिकच्या अंबड पोलिसांत वर्ग झाल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमकी काय आहे घटना ?
नाशिकच्या अंबड पोलीसांत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार 31 वर्षीय मोजेस सोबत तिचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यामध्ये मोजेस आणि पीडित महिला रजिस्टर मॅरेज करणार होते, त्यानुसार पीडित आणि मोजेस आठ महिन्यांपासून वास्तव्यास होते.याच प्रेमसंबंधात मोजेस आणि पीडित महिला यांना तीन वर्षापूर्वी एक मुलगी झाली होती, त्यानुसार त्या मुलीला नातेवाईकांना त्या मुलीला दत्तक दिले होते.
वर्ष उलटत नाही तोच पीडित महिला दुसऱ्यांदा गर्भवती राहिली होती, तीने दोन महिन्यापूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता.दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्यानंतर मोजेस यांच्या वागण्यात बदल झाल्याचे पीडित महिलेने सांगितले होते. त्यानंतर मुलीसह प्रेयसीला सोडून मोजेस याने पलायन केल्याचे महिलेने म्हंटले आहे…
संबंधित प्रकार पीडित महिलेने मालवणी पोलीस ठाण्यात कथन केला होता, नातेवाईकांना घेऊन पीडित महिला मालवणी पोलिस ठाण्यात गेली होती.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






