झुंजार । प्रतिनिधी :- एरंडोल येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी यांनी आक्षेपार्य व अश्लील भाषेचा वापर आपल्या भाषणात केल्याने बाळासाहेबांच्या तक्रारी अर्ज बाळासाहेबांची शिवसेनेच्या पक्षाचे तालुका प्रमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे य
२ नोव्हेंबर २०२२ बुधवार रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ जाहीर सभेत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी महा प्रबोधन यात्रेदरम्यान आक्षेपार्ह भाषण केल्याने या सभेत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी
आमदार चिमणराव पाटील यांच्या विरोधात अश्लाघ्य गरळ ओकत “चिमणाबाई, तमाश्याचा फड” काढून दिला असता असे अपमानजनक वक्तव्य करून सार्वजनिक अपमान केला व शिवराळ भाषा वापरली तसेच त्यांना भविष्यात राजकीय ञास देण्याची धमकी दिल्याने विरोधी गटाचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख रविंद्र भिमसिंग जाधव,राजेंद्र चौधरी व शालिग्राम गायकवाड यांनी फिर्याद दिल्यावरून शरद कोळी यांच्यावर ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल प्रसंगी बाजार समिती त माजी सभापती शालिग्राम गायकवाड उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष राजुआबा चौधरी, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, शहरप्रमुख आनंदा (भगत) चौधरी, संभाजी पाटील, शहर संघटक मयुर महाजन, कृष्णा ओतारी, चिंतामण पाटील विठ्ठल आंधळे, चंदन सिंग जोहरी, प्रवराज पाटील,विजय सोनार दुर्गेश माळी, शंतनु भेलसेकर,गणेश राजपूत अंतूर्ली, दत्तराज वाघ, प्रकाश चौधरी, आदी उपस्थित होते
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






