धरणगाव पोलिस घटनास्थळी दाखल !
धरणगाव प्रतिनिधी-
धरणगाव : – तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरी केलेल्या एका घरातून सोने – चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे.

सविस्तर वृत्त असे, जुना चिकूचा मळा, पिंप्री खुर्द येथे राहत असलेल्या लोटू मुरलीधर पाटील वय – ७३, यांच्या बंद घराच्या कळी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्री. पाटील हे दोन दिवसांपासून दवाखाना करिता बाहेगावी होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच यांच्या घराच्या शेजारी असलेले संदिप किसन खंडेराव वय – ३८ हे खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यांचे घर देखील फोडण्यात आले. परंतू, श्री. खंडेराव यांच्या घरातील काहीही वस्तू चोरीस गेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सपोनि. जिभाऊ पाटील, सहा. फौजदार राजेंद्र कोळी, मोती पवार, समाधान भागवत पोहेका करीम सय्यद , कैलास पाटील , समाधान भागवत आदींसह श्वान पथकासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल असून चौकशी सुरु आहे. तसेच, ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






