मुंबई :- विनू कोशी व त्याच्या पत्नी प्रमिला कोशी या विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर येथे राहात होते. आज सकाळी विनू कोशी यांचा प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना विक्रोळी टागोरनगरमधील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पतीच्या मृत्यूची बातमी मिळताच पत्नीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरात ही मन सुन्न करणारी घटना घडली. या घटनेने कुटुंबासह परिसरातील लोकांनाही धक्का बसला आहे. संपूर्ण कन्नमवार नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विनू कोशी व त्याच्या पत्नी प्रमिला कोशी या विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर येथे राहात होते. आज सकाळी विनू कोशी यांचा प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना विक्रोळी टागोरनगरमधील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी विनू कोशी यांना तपासून मृत घोषित केले.
त्यानंतर पत्नी प्रमिला कोशी यांना या घटनेची माहिती देण्यात आली. पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पत्नीने धसका घेतला. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी देखील त्यांचे प्राण सोडले. आधी पती आणि मग पत्नीचा मृत्यू झाल्याने विक्रोळीतील कन्नमवार परिसरात शोकांतिका पसरली आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






