धरणगाव – दि. ०७/११/२०२२ रोजी धरणगांव वकील संघामार्फत, धरणगांव तहसिलदार साो. यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील विषय म्हणजे “मयत व्यक्तीचे कायदेशीर वारस म्हणून नोंद करण्यासाठी
वारसदार हे तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडे गेल्यावर ते परस्पर केवळ एखाद्या रु. १००/- च्या स्टॅम्पवर लिहीलेला मजकुर, असा दस्त स्विकारुन वारसांची नोंद करुन घेत असतात, तसेच मा. तहसिलदार साो. यांचे रु. १००/- च्या स्टॅम्पवर शपथपत्र असलेला मजकुर स्विकारुन नोंद करून घेत असतात. ” परंतु, अशी
मयत व्यक्तीची नोंद करणे बेकायदेशीर आहे कारण, बॉम्बे रेग्युलेशन अॅक्ट, १८२७ अन्वये वारसांची नोंद करण्यासाठी मे. न्यायालयाकडून वारस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार मे. न्यायालयातुन वारस प्रमाणपत्र (वारस दाखला) घेतल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वारस प्रमाणपत्रावरुन नोंद करणे कायद्याने बंधनकारक आहे.
तसेच मे. न्यायालयाव्यतिरिक्त इतर कोणासही वारस प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मे. न्यायालयाच्या आदेशाचा असलेला वारस प्रमाणपत्र नसल्यास मयत व्यक्तीच्या
वारसांची नोंद करण्यात येवू नये. परंतु वारस प्रमाणपत्र नसल्यावरही परस्पर रु. १००/- स्टॅम्पवर असलेला मजकुर स्विकारुन नोंदी केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे वारसावारसांमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या वाद निर्माण होतात. या बेकायदेशीर प्रक्रियेस आळा घालण्यास धरणगांव वकील संधातर्फे आजरोजी धरणगांव तहसिलदार साो. यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन तहसिलदार यांचे वतीने
नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते साो. यांनी स्विकारले. निवेदन देतांना धरणगांव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर.एस.पाटील, उपाध्यक्ष कैलास मराठे, सचिव अॅड. गजानन पाटील, वकील संघाचे जेष्ठ सदस्य व सदरचा विषय गांभीर्याने घेणारे अॅड. व्ही. एस. भोलाणे, अॅड. राहूल पारेख, अॅड.बी.के.आवारे, ॲड.
सी.झेड. कटयारे, अॅड. मनोज दवे, अॅड. आसीफ कादरी, अॅड. इजराइल युसूफ, ॲड. रामभाऊ शिंदे,
ॲड. संदीप सुतारे, ॲड. संदीप पाटील, अॅड. एकनाथ पाटील, धरणगांव वकील संघाचे सहसचिव अॅड.
प्रशांत क्षत्रिय असे सर्वांनी निवेदन दिले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






