मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना अश्लील शिवीगाळ करून अपशब्द वापरले व त्यांचा अनादर करून अब्रूचे नुकसान केले. त्यामुळे कृषिमंत्र्याविरुद्ध भारतीय दंड विधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवडी तालुका अध्यक्ष उमेश येवले यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात सोमवारी दुपारी एका वृत्त वाहिनीवर बातम्या पाहात असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत अश्लील शिवीगाळ करून अपशब्द वापरला.
खासदार सुप्रिया सुळे या अतिशय विनम्र व अभ्यासू नेत्या आहेत. देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या त्या सदस्य आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचे उंच असे स्थान निर्माण केले आहे. उपरोक्त कृत्यामुळे त्यांचा अपमान होऊन अनादर झालेला आहे. ही बाब आमच्यासारख्या महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांचे मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने दखल घेवून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. असा तक्रार अर्ज काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये दिलेला आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस बबनराव कनावजे, सहकार सेलचे जिल्हा अध्यक्ष राम बोडके, वॉर्ड अध्यक्ष राजेश राणे, सुनिल परब, जयप्रकाश सोलंकी, संतोष वराडकर, महिला वॉर्ड अध्यक्षा भारती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलिसांशी संपर्क साधला असता चौकशी सुरू असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर नारे, निदर्शने, होम हवन करण्यात येत आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






