Crime News : सध्या देशात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच नोएडामध्ये एका माथेफिरून प्रियकराने मंगळवारी निर्दयीपणाचा कळस पार केला. मैत्रीला नकार दिला म्हणून एका तरूणाने होशियारपूर बाजारातील शर्मा मार्केटहून 22 वर्षीय तरूणीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं आणि नंतर तिची बॉडी घेऊन फरार झाला. आरोपीला गाजियाबाद मेरठ एक्सप्रेस वे वरून तरूणीच्या मृतदेहासोबत अटक करण्यात आली आहे. मिळाले ल्या माहितीनुसार, सेक्टर-49च्या होशियारपूर गावातील 22 वर्षीय तरूणी शीतल एका इन्शुरन्स कंपनीत नोकरी करत होती.
आरोप आहे की, गौरव नावाच्या तरूणासोबत तिचा वाद झाला. त्यानंतर गौरवने तरूणीला धक्का दिला. नंतर तो खाली आला आणि तरूणीचा भाऊ असल्याचं सांगत तिला हॉस्पिटलमध्ये नेणार असल्याचं सांगत तिथून पळाला. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबियांनी सांगितलं की, तरूणीचा गौरव नावाचा कोणताही भाऊ नाही. कुटुंबियांच्या माहितीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते. गौरवचा नंबर सर्विलांस लावला. नंतर त्याला डेड बॉडीसोबत पकडण्यात आलं.
पोलिसांनुसार, आरोपीने बिजनौरमध्ये मृतदेह जाळण्याचा प्लान केला होता. तरूणीने आरोपी विरोधात 29 सप्टेंबरला सेक्टर 49 मधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या आधारावर पोलिसांनी गौरवला तुरूंगात पाठवलं. तुरूंगातून परत आल्यावर त्याने तिला धक्का दिला. आरोपीने सांगितलं की, तरूणीसोबत त्याने लग्न केलं होतं.
गौरवने सांगितलं की, आम्ही दोघे 2 वर्षापूर्वी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होतो. आम्ही सोबत 5 वर्ष काम केलं होतं. दोघे लिव्ह इनमध्येही राहिले होते. एका मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. ज्यामुळे तरूणी आरोपीसोबत अनेक दिवसांपासून बोलत नव्हती. ज्यामुळे त्यांच्यात भांडण झालं आणि त्याने तिला धक्का दिला.
पोलीस अधिकारी आशुतोष द्विवेदी म्हणाले की, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि आरोपीला अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






