पुणे : – सध्या महाराष्ट्रात बस चालकांना मारहाण झाल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच पुण्यात एका तरूणाने पी. एम.पी.एम.एल. बस चालकाला अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरी चिंचवड भागात घडली. बसच्या आडवी येणारी दुचाकी काढायला सांगितली म्हणून या तरुणाने थेट बसमध्ये चढून चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर परिसरातील संतोषी माता चौकामध्ये भर दिवसा हा प्रकार घडला आहे. ऋषिकेश घोडेकर असं या तरुणाचे नाव असून, तुला माहित आहे का, मी कोण आहे ? असं म्हणत किरकोळ वादातून या तरुणाने बस मध्ये प्रवेश करत बस चालकाला बेदम मारहाण केली आहे.
पहा व्हिडिओ :
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






