जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
वृषभ :-
आपली मानसिकता जपावी. आजचा दिवस शुभ असेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल. दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. पाहुणे मंडळी भेटतील.
मिथुन :-
आपल्या मनोकामना पूर्ण होतील. वडीलधार्या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. मात्र दिवस काहीसा व्यस्त राहील. नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहील.
कर्क :-
घरातील वातावरण चांगले राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कोष वृद्धीचे संकेत. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. भावनिक निर्णय टाळा.
सिंह :-
आपल्या बोलण्याने लोकांचे समाधान होईल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मुलांच्या जबाबदार्या पार पाडाल. अपचनाचे त्रास संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.
कन्या :-
घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक वातावरण सुखकर असेल. आपल्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा खोळंबा होणार नाही याची काळजी घ्या.
तूळ :-
समाधानकारक आनंदी वार्ता समजतील. उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.
वृश्चिक :-
अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आपल्या मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. बोलताना तारतम्य बाळगवे. विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे.
धनू :-
मानसिक समाधान लाभेल. आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. काही क्षुल्लक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मकर :-
धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
कुंभ :-
दिवस मजेत घालवाल. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालावी. झेपेल इतकेच काम अंगावर घ्यावे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे. मानसिक प्रसन्नता जपावी.
मीन :-
मनातील दूषित गोष्टींना हद्दपार करा. आपल्याच मतावर अडून राहू नका. छोटे प्रवास संभवतात. व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय होईल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






