धक्कादायक ; दोन सख्या भावांचा महिलेवर आळीपाळीने बलात्कार, सिगारेटचे चटकेही दिले

Spread the love

धुळे,(प्रतिनिधी) :- सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जीवे मारण्याची धमकी देत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून दरवाजा बंद करून, पीडित महिलेचे तोंड दाबून, पीडित महिलेवर दोघा सख्या भावांनी आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

तसेच हाताबुक्यांनी, काठीने मारहाण करून आरोपीने पीडितेच्या गुप्त भागावर हाताने मारून, सिगारेटचे चटके देऊन पीडितेस जातीवाचक शिवीगाळ करून अश्लील भाषा वापरली आहे. तसेच पीडितेस जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी पीडित महिलेने दोंडाईचा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार भादंवि कलम अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम ३ (१)(आर)(एस)३(१)(डब्ल्यू)(i)(ii)३(२)(५-अ),भादंवि कलम ३७६ (ड), ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अटक नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना २७ मार्च २०२१ या दिवशी दुपारी १२ वाजेनंतर घडली आहे. १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी रात्री उशिरा दोंडाईचा पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाला आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार