धुळे :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच धुळ्यातील एका बस चालकाने धक्कादायक पाऊल उचललल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान धुळे ते गुजरात बस चालकाने प्रवास केला गाडी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानकात लावली. अन् अचानक चालकाने थांबलेल्या बसमध्ये मध्यभागी असलेल्या नळीला दोरी बांधत गळफस घेतल्याने सगळ्यानाच धक्का बसला आहे. धुळ्यातील बसचालकाने गुजरातमध्ये आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. नवीन पाटील असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
देवपुरातील नगावबारी परिसरातील रहिवासी नवीन गुलाराव पाटील शनिवारी धुळे-सुरत बस (एमएच-२०-बीएन-२५९५) घेऊन सुरतला आले होते. उधना येथे रात्री ते मुक्कामी होते. सायंकाळी मित्रांसोबत त्यांनी जेवण घेतले. दरम्यान बस मध्यरात्री सुरतच्या उधना बस स्थानकात जाताच कोणी नसल्याचा अंदाज घेत. त्यानंतर रात्री बसमध्ये दोरीने गळफास घेतला. मध्यरात्री हा प्रकार समोर आला.
ही घटना काल मध्यरात्रीची घडली असून आज सकाळी निदर्शनास आली आहे. या घटनेनंतर गुजरात परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सदर चालकाचा मृतदेहाचा पोस्टमार्टम करून कायदेशीर प्रक्रियेनंतर धुळ्याला पाठवण्यात येणार आहे. दरम्यान चालक पाटील यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.. आत्महत्या करण्यापूर्वी पाटील यांनी मित्रासोबत जेवण केले होते. त्यानंतर त्यांनी गळफास घेतला.
हे वाचलंत का. ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






