जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
प्रयत्नांची कास सोडू नये. मिळकत व खर्च यांचे संतुलन ठेवावे. आपली स्वप्ने पूर्णत्वास जातील. रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा.
वृषभ :-
लहान प्रवास संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. कष्टाशिवाय काही हाती लागणार नाही. यात्रा सुखकर होईल.
मिथुन :-
प्रलंबित कामे मार्गी लागतील. शेजार्यांचे सहकार्य मिळेल. दिवस उत्तम फलदायी असेल. आर्थिक बाबतीचे प्रयत्न यश देतील. तज्ञ व्यक्तींची भेट होईल.
कर्क :-
आहारावर नियंत्रण ठेवावे. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वरिष्ठांना नाराज करू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. वाणीत माधुर्य जपावे.
सिंह :-
कामातील समस्या दूर कराव्या लागतील. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायांना इजा संभवते. वैचारिक स्थिरता ठेवावी. आपले छंद जोपासावेत.
कन्या :-
विरोधकांच्या करवायला कमी होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात मान वाढेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल.
तूळ :-
धनलाभाचे योग संभवतात. नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एखादी मौल्यवान वस्तु मिळेल. विरोधक पराभूत होतील.
वृश्चिक :-
व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. कामाचा ताण जाणवेल. उगाच चिडचिड करू नये. जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा.
धनू :-
स्पर्धेत यश मिळेल. भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हातातल्या कामाचा कंटाळा करू नका. मौल्यवान वस्तूंचे जतन करा.
मकर :-
आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही अति विश्वास दाखवू नका.
कुंभ :-
मुलांच्या जबाबदार्या पार पाडाल. पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील. थोडीशी धावपळ करावी लागेल. देवावरील श्रद्धा वाढेल. जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकतील.
मीन :-
गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. बोलताना शब्द जपून वापरा. मानसिक शांतता लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






