अभ्यासिकेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची संधी मिळेल-आ. चिमणराव पाटील.एरंडोल येथे अभ्यासिका आणि वाचनालयाचे उदघाटन.

Spread the love

एरंडोल-मैत्री सेवा फाऊंडेशनने सुरु केलेल्या मोफत अभ्यासिका आणि वाचनालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार असून त्याना विविध स्पर्धा परीक्षांची संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.मैत्री सेवा फाऊंडेशनच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या कल्पतरू वाचनालय आणि अभ्यासिकेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी अध्यक्षस्थानी होते.आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्याना विविध स्पर्धा परीक्षांचे पुस्तके उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.मैत्री सेवा फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी दोन वर्षापूर्वी अभ्यासिका आणि वाचनालय सुरु करण्याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांना बांधकामासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.मैत्री सेवा फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी युवक असून ते कोणत्याही पक्ष अथवा संघटनेशी संबंधित नाही केवळ सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.आगामी काळात देखील सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेवून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करावे असे आवाहन केले.यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांनी अभ्यासिका सुरु करणे काळाची गरज असून यामुळे गरीब विद्यार्थ्याना हक्काची जागा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सैन्यदलात निवड झालेल्या युवकांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.फाऊंडेशनचे प्रमुख पियुष चौधरी यांनी प्रास्ताविक केले.सागर महाजन यांनी सुत्रसंचलन केले.पंकज पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,उद्योजक संजय काबरा,धनश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल तिवारी,एम.डी.बी.केमिकल्सचे संचालक पंकज काबरे,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),माजी नगरसेवक अभिजित पाटील,योगेश महाजन, प्रा.के.जे.वाघ,कुणाल चौधरी,चिंतामण पाटील यांचेसह पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी गौरव महाजन,सागर महाजन,शुभम महाजन,संतोष जैस्वाल,तुषार महाजन,निलेश बाकळे,हेमंत पाटील, निखील शेंडे,श्यामासीन पाटील,जयवीर पाटील,ज्ञानेश्वर महाजन,रोशन महाजन,चेतन शिंपी यांचेसह पदाधिका-यांनी सहकार्य केले.

हे पण वाचा

टीम झुंजार