खळबळजनक! पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Spread the love

धुळे :- येथे पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रविण कदम असं या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण कदम यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असल्याचे देखील उघड झाले आहे.

धुळे येथे पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि 15 नोव्हेंबर मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात हा गळफास घेतला आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते.

या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ होत आहे. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये एक सुसाईड नोट आढळून आली आहे. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये एका अपघाताच्या गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास झाला नसल्याने खंत व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय बारकुंड यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाची पाहणी केली. पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांचा मृतदेह हिरे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

कदम यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, ‘याला मी जबाबदार आहे, यास कोणीही जबाबदार नाही. गंगापूर पोलीस ठाणे येथील फेटल गुन्ह्याचा चुकीचा तपास करणीभूत असल्याचे म्हटले आहे. प्रवीण कदम यांनी लिहिलेल्या या धक्कादायक सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे गंगापूर पोलीस ठाण्यात कुठला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आला तसेच यामागे त्यांच्यावर कोणाचा दबाव होता या सर्व गोष्टी आता पुढे आल्यावरच समजेल की प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली.
धुळे पोलिसांनी प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली व या सुसाईड नोटचा त्यांच्याशी काय संबंध आहे, या सर्व गोष्टींचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

टीम झुंजार