एरंडोल येथील सर्प मित्र यांना ‘द रियल हिरो अवॉर्ड २०२२ प्रदान.

Spread the love

हिंगोली (नांदेड) : – एंरडोल शहरातील सर्प मित्र मुकेश सोनार यांना ‘द रियल हिरो अवॉर्ड २०२२. सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्पमित्र मुकेश सोनार हे संपूर्ण एरंडोल तालुक्यात सर्पमित्र म्हणून काम करतात , आणि ते वन्य जीव संरक्षण समिती जळगाव चे ते सदस्य आहेत.

विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, पहेनी हिंगोली द्वारा आयोजित डॉ संजय नाकाडे व निलीमकुमार खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य जीव क्षेत्रात उल्लेखनीय कार्या बद्दल वन्यजीव रक्षक व सर्पमित्रांना निलीमकुमार खैरे यांच्या हस्ते ” द रियल हिरो अवॉर्ड २०२२ ” देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम आज 23 सप्टेंबर शुक्रवार रोजी, विजय राज पाटील मित्र मंडळ व महाराष्ट्रातील सर्पमित्र प्राणी मित्र यांच्या वतीने हिंगोली (नांदेड) येथे मोठया दिमाखात कार्यक्रम पार पडला.

सर्पतज्ञ डॉ. निलमकुमार खैरे व सर्पतज्ञ सर्पदंश चिकित्सक डॉ. संजय नाकाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली येथे आपल्या जीवाची पर्वा न करता सतत वन्यजीवांच्या सेवेत कार्यरत असणारे सर्व महाराष्ट्रातील सर्पमित्रांना द रियल हिरो तसेच सर्पमैत्रीण यांना शुर तेजस्वीनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एरंडोल तालुक्यातील सर्पमित्र मुकेश सोनार यांनी वन्यजीवांची सेवा करत घोरपड, मुंगुस, खवल्यामांजर, पिसाळलेले वानर, माकड , घुबड, घार, जंगली ससा, सारसुळ (सायाळ ), ऊदमांजर (मरलांगी) कासव, शेततळामध्ये पडलेले कुत्रे इ. प्राणी पक्षी अशा जख्मी पशु-पक्षांना रात्री-अपरात्री चोविसतास सेवा पोटच्या लेकरा सारखे जखमी प्रान्या पक्षांना सांभाळ करनारे एरंडोल तालुक्यातील सर्पमित्र मुकेश सोनार यांना द रियल हिरो आवार्ड पुरस्कार देवुन डॉ.सर्पतज्ञ निलमकुमार खैरे यांच्या हस्ते द रियल हिरो पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात आले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार