अमळनेर :- सध्या महाराष्ट्रात अवैध रीत्या गांजा तस्करीचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिसांनी सापळा रचून गुजरात पासिंग चार चाकी वाहनातून अंदाजे 50 किलो गांजा जप्त केला. तर आरोपी पोलिसांना पाहून फरार झाले. ही कारवाई अमळनेर गांधली रस्त्यालगत विजय नवल पाटील कृषि महाविद्यालच्या मागे गुरुवारी मध्यरात्री केली. यातील फरार आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळणार अशी माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली.
अमळनेर मार्गे गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला. रात्री 1 वाजेच्या सुमारास गुजरात पासिंग चार चाकी वाहन आणि एक दुचाकी गांधली रस्त्यालगत विजय नवल पाटील कृषि महाविद्यालच्या मागे दिसून आली. पोलिसांची चाहूल लागताच दोघे संशयित तेथून पसार झाले. पोलीस पथकाने वाहनाची तपासणी करून अंदाजे 50 किलो गांजा पकडला. गांजासह चारचाकी वाहन आणि जावा लाल कलरची दुचाकी जप्त केली. ही कारवाई स्वतः पोलिस निरीक्षक जयपाल हिरे पथकात सहभागी होऊन मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, रवि पाटील, दीपक माळी, सुनिल पाटील, शरद पाटील, यांनी केली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






