आत्मदहनाचा इशारा देणारे दोघे सोयगावात परतले; मुंबईतील नरिमन पॉईंट पोलिसांकडून मनपरिवर्तन

Spread the love

सोयगाव, दि.१८..अवैध गौण खनिजप्रकरणी महसूल व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांच्या मनमानीला कंटाळून सोयगावातील दोघांना मुंबईतील नरिमन पॉईंट पोलिसांनी ताब्यात घेऊन मनपरिवर्तन केल्याने आणि पोलिसांनी मंत्रालयात महसूल आणि गृहसचिव यांचे शी या दोन्ही आंदोलकांची भेट घडवून दिल्याने दोघेही शुक्रवारी पहाटे सोयगावात परतले आहे.
सोयगाव तालुक्यात अवैध गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असल्याचा तक्रारी करूनही तसेच जुलै महिन्यात सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाची वाहतुकीवर कारवाई साठी अडथळा आणणाऱ्या नायब तहसीलदारावर कारवाई साठी टाळाटाळ होत होती

तसेच पोलिसांनी वाळू माफियांना हाताशी धरून या दोघांच्या वर खोटे गुन्हे दाखल केल्या प्रकरणी संदीप इंगळे व दिलीप शिंदे हे दोन्ही थेट आत्मदहन साठी मंत्रालयात रवाना झाले होते त्यांना मुंबईतील नरिमन पॉईंट पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे मन परिवर्तन करून या आंदोलकांची मंत्रालयात महसूल सचिव शिवाजी चौरे,रमेश चव्हाण यांचेशी भेट घडवून सविस्तर चर्चा घडवून आणली यामध्ये तीन तास मंत्रालयात झालेल्या चर्चेत तोडगा निघून मंत्रालयातून महसूल सचिव शिवाजी चौरे यांनी याप्रकरणी चौकशी साठी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना चौकशी साठी लेखी पत्र देण्याचे आश्वासन दिल्याने या दोघांनी आत्मदहन आंदोलन मागे घेऊन घरी परतले आहे

दरम्यान नरिमन पॉईंट चे पोलीस निरीक्षक शंकर पाटणकर, गुप्त वार्ता विभागाच्या उपनिरीक्षक स्वप्नाली जंगले, अलका ठाकूर, एस आय टी चे अमोल ठाकुर यांनी या दोघांना मनपरिवर्तन करून तोडगा काढला त्यामुळे दोघे आंदोलक शुक्रवारी पहाटे सोयगावात परतले आहे
दरम्यान मंत्रालयाकडून विभागीय आयुक्तांना होणाऱ्या पत्र व्यवहारात कोणावर कारवाई होईल हे आता तीन दिवसांनी स्पष्ट होणार आहे..

छायाचित्र-मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा देणारे दोघे सोयगावात

हे पण वाचा

टीम झुंजार