धरणगाव : – सध्या महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. मद्याच्या नशेत दिरानेच आपल्या वहिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून याबाबत धरणगाव पोलिसात पिडीत महिलेच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे घटना ?
पिडीत महिलेने आपल्या दोघं दिरांविरुद्ध पोलिसात तक्रार दिलेली होती. याचाच राग धरून ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दारूचा नशेत घरात प्रवेश करीत आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली?, दिलेली तक्रार मागे घे. नाहीतर तुला सोडनार नाही, अशी धमकी दिली. तसेच पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर, तुझ्या मुलीला गुंड लावून मुंबईला उचलुन घेऊन जाऊ व तुम्हाला समाजात तोंड दाखविण्यास लायक ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच पिडीता ही १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आंघोळ करीत असतांना दुसरा दीर हा गुपचुप पाहत होता. ही गोष्ट पिडीतेच्या मुलीने बघतातच त्याने तिथून पळ काढला होता.
अशा प्रकारे संशयित आरोपींनी वेळोवेळी आपल्या वाहिनीचा वेळोवेळी विनयभंग केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.कॉ उमेश भालेराव हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






