जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मनात ठरवलेल्या गोष्टी तशास घडतील. कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. परिचितांना मदत कराल.
वृषभ :-
धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. व्यावसायिक उन्नती साधता येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे. नवीन लोक संपर्कात येतील.
मिथुन :-
ठरवलेल्या गोष्टीत सारखे बदल करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. बुद्धी चातुर्याचा वापर कराल. भावंडांचे सहकार्य मिळेल.
कर्क :-
व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. विलंबित गोष्टी मार्गी लागतील. दिवस माध्यम फलदायी असेल. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा. भावनांना आवर घालावा.
सिंह :-
आपली मनोकामना पूर्ण होईल. जुनी उधारी वसूल होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. संयमाने परिस्थिती हाताळा.
कन्या :-
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. घरासाठी मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. बचतीच्या योजना आखाव्यात. अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल.
तूळ :-
महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल. कौटुंबिक खर्च वाढेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. समोरील गोष्टीत आनंद माना. मुलांची प्रगती दिसून येईल.
वृश्चिक :-
वादाचा मुद्दा पटवून देऊ नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. व्यवसायात चांगल्या संधि प्राप्त होतील. नवीन कार्यारंभास अनुकूल काळ. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.
धनू :-
मुलांकडून सुवार्ता मिळतील. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीची नवीन संधि प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या.
मकर :-
विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल.
कुंभ :-
बोलताना भान हरवू नका. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. सढळ हाताने मदत करा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
मीन :-
प्रतिस्पर्ध्याशी सावधानतेने वागा. आततायीपणे निर्णय घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांशी नाते दृढ होईल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






