धक्कादायक : पलंगावर उभे राहून नववीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

Spread the love

साक्री :- सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलाच्या आत्महत्या केल्याचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील छडवेल येथील छात्रालयात नववीतील साहीद पाडवीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डबल बेडवर उभ राहून त्याने छतापर्यंत दोरी बांधून गळफास घेतला. निजामपूर पोलिसांत नोंद झाली.

छडवेल येथील महात्मा जाेतिराव फुले छात्रालयातील साहीद दिलीप पाडवी (वय १५) याची आत्महत्या नसून, घातपात असल्याचा आरोप कुटुंबीय व नातलगांनी केला आहे. त्यामुळे नातलगांनी दोषींवर गुन्हा दाखल करा तरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी समजूत काढल्यावर मध्यरात्री दीड वाजता रुग्णवाहिका मृतदेह घेऊन शहरात आली. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजता इनकॅमेरा शवविच्छेदन झाले. दरम्यान, दिवाळीच्या सुटीनंतर मुले छात्रालयात आले होते. साहीद १३ नोव्हेंबरला आला. सोमवारी व मंगळवारी तो नियमितपणे शाळेत होता. घटलेला प्रकार समोर आल्यानंतर पोलिस आले. बुधवारी रात्री नऊ वाजेनंतर साहीदचा भाऊ आला. त्याच्या समक्ष मृतदेह उतरवण्यात आला.

आरोपांच्या मागे कारण

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार साहीद तणावात नव्हता. त्याचा हात छतापर्यंत पुरला कसा, मृतावस्थेत त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत होतेे. बेडवर उभा राहून साहीदने छताला गळफास घेतला. शिवाय मृतदेहाजवळील बेड उभा होता.

नेमके काय घडले ?

काही मुले जेवणाचे ताट घेण्यासाठी रूम नं. ९ मध्ये गेले. त्यावेळी या रूमला आतून कडी लावली होती. त्यामुळे मुलांनी मागील बाजूस असलेल्या खिडकीतून पाहिले असता साहीदने गळफास घेतल्याचे दिसले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार