नाशिक :- सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. तरुण मुलींमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कधी प्रियकरावरून, कधी ट्रेन मध्ये तर कधी आपआपसातील जलसी वृत्तीमुळं तरुणींमध्ये कडाक्याचं भांडण होत असतं. नाशिकमध्येही असाच एक प्रकार समोर आला.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या ठिकाणी चार मुली एकमेकींच्या झिंज्या ओढताना दिसत आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती
पहा व्हिडिओ :
विद्यार्थिनींमध्ये झालेल्या हाणामारीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र समाज माध्यमांवर मुलींमधील या ‘दंगल’चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिला तर हा सर्व प्रकार महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये घडलेला असावा असे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयातच झालेल्या या प्रकारामुळे शिक्षक किंवा कर्मचारी हा सर्व प्रकार घडत असताना कुठे होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्याऐवजी घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी त्याचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे.
मात्र काही वेळाने दोघांचे काही मित्र पुढे आले आणि त्यांनी दोघांना वेगळे केले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉलेजने दोघांनाही ताकीद देऊन सोडले होते. दरम्यान आता पुन्हा असाच एक हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे आता कॉलेजच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सदर महाविद्यालय प्रशासन काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






