चोपडा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सेवाभावी व्यक्तिमत्व तथा भूमिपुत्र डॉ.चंद्रकांत बारेला व मित्रमंडळाचा स्नेहमेळा आज दि.२० रोजी दुपारी नारायणवाडी येथील जनसेवा हॉस्पिटल परिसरात उत्साहात संपन्न झाला. स्नेहमेळ्यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी चोपडा तालुकाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपण आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका लढवाव्यात असा आग्रह डॉ.चंद्रकांत बारेला यांच्याकडे केला.येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता चोपडा तालुक्यातील डॉ.चंद्रकांत बारेला मित्र मंडळाचा स्नेहमेळा आयोजित करण्यात आला होता.
यात मागील मोर्चाचा आढावा घेणे,धरणगाव येथील खाजा नाईक यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करणे, ग्रामीण भागातील जनतेला रोजगार, शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक स्वरूपात कसा मिळवून देता येईल,त्यासाठी करण्यात येणारी जनजागृती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र आपण येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या सर्व जागा एकलव्य संघटना व डॉ.चंद्रकांत बारेला मित्रमंडळाच्या माध्यमातून लढवाव्यात असा आग्रह धरला. यावर बोलतांना डॉ.बारेला म्हणाले की, तुमच्या सगळ्यांच्याआग्रहाचा इच्छेचा मी आदर करतो,याचा नक्की विचार केला जाईल,पण घाईत निर्णय न घेता त्याआधी गाव तिथं संघटन मिटिंगा, सभा घेऊन जनतेशी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून,त्यांची मत जाणून घेऊन योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल.
यावेळी एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष सखाराम सोनवणे, उपाध्यक्ष अप्पा अहिरे,युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे,संघटक दुर्यीधन ठाकरे,कार्याध्यक्ष हेमंत वाघ,टायगर फोर्स अध्यक्ष बापू गायकवाड,सुनील अहिरे,अशोक वाघ,राजेंद्र भिल,आधार भिल, डॉ.चंद्रकांत मित्रमंडळाचे अमोल राजपूत सचिन डाभे,दिपक वानखेडे,ईश्वर सुर्यवंशी, निलेश जाधव,सचिन पाटील,वसंत कोळी,दिलावर तडवी,राहुल अहिरे,बापू मोरे, समाधान महाजन, अल्केश महाजन, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, स्नेहमेळ्या नंतर सगळ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






