दुर्दैवी घटना : बाथरूम मध्ये गुदमरून विद्यार्थ्यांचा मृत्यू

Spread the love

एरंडोल : – येथील रेणुका नगरा मधील वास्तव्यात असलेले माध्यमिक शिक्षक व्ही टी पाटील यांचा मुलगा (साई) यश वासुदेव पाटील वय १६ वर्ष हा घरातील बाथरूम मध्ये अंघोळीस गेला असता गॅस गिझर चा गॅस गळती झाल्यामुळे गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सोमवारी सकाळी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. यश हा इयत्ता दहावीत रा.ती काबरे विद्यालयात शिकत होता तसेच तसेच व्ही टी पाटील हे सुद्धा त्याच शाळेत कार्यरत आहेत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान बराच वेळ झाल्यामुळे तो बाथरूम मधून बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटली त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही शेवटी दरवाजा तोडण्यात आला असता त्याचा मृतदेह आढळून आला त्यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले ‌‌

यावेळी आई-वडिलांनी एकच हंबर्डा फोडला हे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले असता नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

शिवसेना(उ बा ठा ) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पुंडलिक पाटील यांचा तो पुतण्या होत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार