एरंडोल:~ येथील रेणुका नगर मधील दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यांच्या अंघोळ करीत असताना गॅस गिझरच्या गळतीमुळे बाथरूम मध्येच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजता घडली उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेला युवा खेळाडूचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की एरंडोल येथील रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयातील शिक्षक वासुदेव त्र्यंबक पाटील हे परिवारासह रेणुका नगर येथे वास्तव्यात आहेत. वासुदेव पाटील यांचा दहावीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा यश(साई) वासुदेव पाटील वय 16 वर्षे हा सकाळी आई, वडील व मामा यांचे सोबत बसला होता.
सकाळी दहा वाजेच्या सुमारास यश पाटील हा बाथरूम मध्ये आंघोळ करण्यासाठी गेला बराच वेळ झाला तरी यश आला नाही म्हणून त्याचे वडील वासुदेव पाटील यांनी त्यास हाका मारल्या मात्र काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी व यशचे मामा दीपक जयसिंग पाटील यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला त्यावेळी यश हा बाथरूम मध्ये खाली पडला होता आणि बाथरूम मध्ये गॅस गळतीचा वास येत होता. वासुदेव पाटील व दीपक पाटील यांनी यशला ताबडतोब कल्पना हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यास तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. याबाबत दीपक हरसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील लोहार तपास करीत आहेत.
दरम्यान यश पाटील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित होता. सायकल चालवणे, व्यायाम करणे, क्रिकेट खेळणे,याचा त्यास छंद होता क्रिकेट भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा त्याचा आयकॉन होता. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कडून १६ वर्षाखालील संघाकडून अमरावती येथे बांगलादेश विरुद्ध खेळला होता या सामन्यात त्याने 112 रन काढले होते. भारतीय क्रिकेट संघातर्फे खेळण्याची त्याची इच्छा होती आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न देखील करीत होता.
शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख ठाकरे गट जगदीश पाटील खडके येथील एम.डी. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांचा यश पुतण्या होता.
यश हा शिक्षक वासुदेव पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. यश याच्या पश्चात आई, वडील, मोठी बहीण असा परिवार आहे. चार महिन्यापूर्वीच त्याची मोठी बहीण पुणे येथे नोकरीस लागली होती. यश याचे ई दहावी पास झाल्यावर पुढील शिक्षण घेण्यासाठी तो पुणे येथे जाणार असल्याचे त्याने आपल्या वडिलासह आपल्या मित्रांना सांगत होता.
घटनेची माहिती मिळताच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे शिक्षक वासुदेव पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येने पोहचले.
ग्रामीण रुग्णालय येथे डॉ. कैलास पाटील डॉ. मुकेश चौधरी यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले रात्री नऊ वाजेच्या सुमारास यश पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






