किरकोळ विक्रेत्यांकडून होत असलेले जीएसटीचे नुकसान रोखण्याची मागणी

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल चलनाला वाव देत रोखीने व्यवहार करण्याऐवजी युपीआयसारख्या माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून, फेरीवाले तसेच टपरीवालेदेखील युपीआय पद्धतीचा अवलंब करून गुगल पे, पेटीएम, फोन पे या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे स्वीकारत आहेत.

हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होत आहे. अशावेळी त्यांच्याकडून भारतीय आर्थिक व्यवस्थेतील नियमानुसार जीएसटी प्राप्त करून घेणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यातून जनतेच्या योजनांसाठी महसूल मिळत असतो. अशावेळी जे विक्रेते ही पद्धती अवलंबित आहेत, त्यांच्याकडून जीएसटी प्राप्त होईल, अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे.

म्हणूनच भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या युपीआय पद्धतीचा अवलंब करणार्‍यांना रक्कम अदा झाल्यानंतर त्वरित त्यातून जीएसटी शासकीय तिजोरीत वळवून घेता येईल, अशी पद्धती सुरु करावी, अशी मागणी दक्ष नागरिकांकडून समाजसेवक गोविंद शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार