मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल चलनाला वाव देत रोखीने व्यवहार करण्याऐवजी युपीआयसारख्या माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून, फेरीवाले तसेच टपरीवालेदेखील युपीआय पद्धतीचा अवलंब करून गुगल पे, पेटीएम, फोन पे या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे स्वीकारत आहेत.
हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होत आहे. अशावेळी त्यांच्याकडून भारतीय आर्थिक व्यवस्थेतील नियमानुसार जीएसटी प्राप्त करून घेणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यातून जनतेच्या योजनांसाठी महसूल मिळत असतो. अशावेळी जे विक्रेते ही पद्धती अवलंबित आहेत, त्यांच्याकडून जीएसटी प्राप्त होईल, अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे.
म्हणूनच भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या युपीआय पद्धतीचा अवलंब करणार्यांना रक्कम अदा झाल्यानंतर त्वरित त्यातून जीएसटी शासकीय तिजोरीत वळवून घेता येईल, अशी पद्धती सुरु करावी, अशी मागणी दक्ष नागरिकांकडून समाजसेवक गोविंद शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे केली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






