धुळे :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच शिरपूर ते शिंदखेडा रस्त्यावरील तापी नदी पुलावरुन २४ वर्षीय तरुणाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल सायंकाळी घडली आहे. तापी नदीच्या पुलावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने तरुणाचा बुडतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. रात्री उशिरापर्यंत नदीत तरुणाचे शोधकार्य सुरु होते. सुरेंद्र सरदारसिंग राजपूत असे आत्महत्या करणाऱ्या २४ वर्षीय मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथील सुरेंद्र राजपूत हा काल सायंकाळी आपल्या डिस्कव्हर कंपनीच्या मोटरसायकलीने गिधाडे गावा जवळील तापी नदीच्या पुलावर आला. पुलावर मोटरसायकल उभी करुन आपले जीवन संपवण्यासाठी त्याने तापी नदीत उडी घेतली. हा सर्व थरारक प्रकार त्याच पुलावरुन वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाने त्याला उडी घेताना बघितल्यानंतर आरडाओरडा केला. प्रवाशाचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. यादरम्यान तो पाण्यात बुडत असतानाचा व्हिडीओ यावेळी एका प्रवाशाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






