नंदुरबार : – सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे घडला. इतकेच नव्हे तर व्हीडीओ करून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार?
विसरवाडी (ता. नवापूर) येथील युवतीशी काही जणांची ओळख झाली. यानंतर संशयीतांनी युवतीला नोकरीला लावून देतो असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. इतक्यावरच थांबले नाही, तर युवतीचा व्हीडीओ करून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित युवतीने १८ नोव्हेंबरला विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्को व विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे. मुख्य संशयित आरोपी जुबेर हासिनोद्दीन शेख, वहिदा शेख, दानिश मन्सुरी, यासह पत्नी, वडील, आई, भाऊ व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक झाली आहे. ते विसरवाडी येथील रहिवासी आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






