नवी दिल्ली : – सध्या देशात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच दिल्लीत एका धक्कादायक घटना समोर आली आहे.व्यसनमुक्ती केंद्रातून परतलेल्या तरुणानं संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची घटना नवी दिल्लीत मंगळवारी घडली. काही महिन्यांपासून व्यसनमुक्ती केंद्रात असलेला २५ वर्षांचा केशव घरी परतला. काही कारणावरून त्याचा कुटुंबीयांशी वाद झाला. यानंतर केशवनं आई, वडील, लहान बहिण आणि आजीची चाकूनं भोसकून हत्या केली.
हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस रात्री साडे दहा वाजता घटनास्थळी पोहोचले. आरोपीनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पकडण्यात यश आलं. आरोपीनं धारदार शस्त्राचा वापर करून कुटुंबीयांचा गळा कापला आणि त्यांच्यावर अनेकदा वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी केशवविरोधात कलम ३०२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

केशवचं कुटुंब एका इमारतीत दुसऱ्या इमारतीत राहायचं. याच इमारतीत केशवचे इतर नातेवाईकदेखील राहतात. केशवचा चुलत भाऊ कुलदीप दुसऱ्या मजल्यावरील आक्रोश ऐकला आणि पोलिसांना फोन केला. वाचवा, वाचवा असं म्हणत केशवची बहिण उर्वशीनं आक्रोश केला. यानंतर कुलदीपनं पालम पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
पोलिसांना घटनास्थळी चार मृतदेह आढळले. केशवनं पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. केशवकडे स्थिर नोकरी नव्हती. त्यामुळे कुटुंबियांचे केशवशी वाद घालायचे. हत्येवेळी केशव नशेच्या अमलाखाली होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
केशव काही महिने नशामुक्ती केंद्रात होता. मात्र त्याच्या आईनं त्याला परत आणलं. आईनं प्रेमापोटी केशवला घरी परत आणलं होतं. मात्र त्याची अमली पदार्थांची सवय काही सुटली नव्हती. तो अनेकदा हेरॉईन आणि गांजाचं सेवन करायचा, असं कुलदीपनं सांगितलं. तो एका ठिकाणी नोकरीला लागला होता. हत्येच्या १० दिवस आधीपर्यंत तो कामाला जात होता, अशी माहिती त्यानं दिली.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






