पारोळा – महाराष्ट्र विधानमंडळाचा २१ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये आमदार चिमणराव पाटील यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणुन निवड करण्यात आली.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहमदनगर) येथील कृषी विद्यापीठ महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९६७ अन्वये १९६८ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठास आद्य समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्यात आले.
पंजाबराव कृषी विद्यापीठ अधिनियम १९६८ अन्वये वरील महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यात आली. कृषिशिक्षणास विशेष सवलती लाभून कृषिविज्ञानाचा विकास साधणे हा अधिनियमातील सुधारणेमागील हेतू आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नासिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर सातारा, सांगली आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र राज्यातील लागवडीखालील एकूण १९४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ८० लाख हेक्टर म्हणजे ४०% क्षेत्र व पिकाखालील क्षेत्रापैकी ४१% क्षेत्र या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येते.
कृषिशिक्षण, संशोधन व विस्तार या तिहींची सांगड घालून कृषिव्यवसायातील समस्यांची उकल करणे, हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. विद्यापीठाची पाच घटक महाविद्यालये असून राहुरी येथे पदव्युत्तर शिक्षण संस्था (स्था. १९७२) आहे. पदवीपूर्व शिक्षण हे पुणे, धुळे व कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयांतून दिले जाते. कृषिविस्तार शिक्षण हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. प्रात्यक्षिके, सहली, मेळावे आदीद्वारे आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा प्रसार केला जातो.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विभागात खरीप व रब्बी हंगामांत या पिकाखाली अनुक्रमे ४,८६,६०० हेक्टर व २१,७०,१०० हेक्टर एवढे क्षेत्र आहे. बीजोत्पादन हे या विद्यापीठाचे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे.
या संस्थेव्दारे शेती क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी कशी भरीव कामगिरी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असुन माझी निवड मला प्रिय असलेल्या क्षेत्रात केल्यामुळे मी करत असलेल्या माझ्या समाजकारणाचा मुळ मुद्दा म्हणजे शेतकरी असल्याने शेतकऱ्यांसह शेती शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी नवऊर्जा प्राप्त होणार आहे. तसेच शेती शिक्षण क्षेत्रात युवकांना आकर्षण होणेसाठी विद्यापीठाचा माध्यमाने सदैव कार्य करणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.
तसेच यानिवड बद्दल आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे लाडके तथा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस, कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार यांचे आभार मानले आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






