संविधान जागृती प्रभात फेरीने वेधले सर्वांचे लक्ष..!
पिंप्री खु प्रतिनिधी
धरणगाव :- भारतीय संविधान दिनानिमित्त पिंप्री खु ता धरणगाव येथील आदर्श प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम संपन्न झाले. भारतीय संविधान हा भारत देशाचा पाया आहे . संविधान सर्वांना मौलिक अधिकार देत आपले हक्क व कर्तव्य यांची जाण करून देते. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 26 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय संविधान दिवस निमित्ताने मोठ्या उत्साहात शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .

या वेळी प्रभात फेरी संविधान सन्मान रॅली काढून विद्यार्थ्यांनी संविधान दिनाचा विजय असो अश्या घोषणा देत आपला आदर व्यक्त केला . त्याच प्रमाणे विद्यालयात निबंध ,चित्रकला , व प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी विध्यार्थ्यांना व शिक्षकांना सामूहिक संविधान शपथ देण्यात आली . प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद मधुकर चौधरी यांनी प्रतिमा पूजन केले.

या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ व्ही एम चौधरी , उपशिक्षक आर आर पावरा आदी उपस्थित होते . एस के शिंदे यांनी संविधान विषयावर माहिती दिली तर आर एस पाटील सर यांनी संविधान आपल्याला जीवनात कश्या प्रकारे आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला .
सूत्रसंचालन शरीफ पटेल यांनी केले तर आभार सचिन पवार यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






