झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर )भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना होय. विद्यालयात संविधान पुस्तिकेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त उबाळे सर यांनी संविधानाचे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले.

उद्देशिकेचे वाचन शिक्षिका नलिनी गायकवाड यांनी केले. संविधान दिनानिमित्त वालचंदनगर मध्ये भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देऊन संविधानाचे महत्व नागरिकांना सांगितले. कार्यक्रमासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे एपीआय साळुंखे साहेब उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्याध्यापक बाळासाहेब पडारी सर यांनी केले तर सूत्रसंचालन सुरज मोरे सर यांनी केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






